आज दि 9/10 2017 रोजी जि. प. शाळा येवे, केंद्र - पिंपळोली, ता अंबरनाथ, जि. ठाणे
येथे विषय तज्ज्ञ श्री. भगवान बोरसे यांच्या समवेत शाळेस भेट दिली.
1- ई 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक परिपाठ घेतला.
2- शालेय परिसर स्वच्छ, सुंदर असून शैक्षणिक साहीत्याने संपन्न आहे.
3- विद्यार्थ्यांशी संवाद साधून ज्ञानरचनावादी पध्दतीने संख्यावाचन, व गुणाकार क्रियांचा सराव घेतला.
3- भागाकार म्हणजे वस्तुंची समान वाटणी हे प्रत्यक्ष कृतिद्वारे स्पष्ट केले.
4- श्री. बोरसे सर यांनी भागाकाराची विविध शाब्दिक उदाहरणे देउन सराव घेतला.
5- विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
6- शाळेच्या शिक्षिका श्रीम. वारके मँडम यांच्याशी संवाद साधला असता ई 1 ली तील रूपाली हि विद्यार्थिनी शाळेत अनियमित असते असे समजले, अनेक वेळा प्रयत्न केले तरी रूपाली शाळेत येण्याचा कंटाळा करते असे समजले.
7- श्रीम. वारके मँडम, श्री. बोरसे सर, यांच्या समवेत रुपालीच्या घरी भेट दिली., पालकांचे प्रबोधन केले, रुपालीशी गप्पा मारून तिला शाळेत येण्याविषयी समजावून सांगितले.
8- आम्ही सगळे तिला घ्यायला आलो आहोत हे समजल्यावर रूपाली गोड हसली व तयारी करून शाळेत आली सुध्दा......
9- मी रोजच शाळेत येणार असे तिने मला निघताना टाटा करून सांगितले.
10- मी रोज तुमच्या मँडम यांना फोन करून चौकशी करेन असे सांगितल्यावर, मँडम मी पण तुमच्याशी फोनवर बोलेन असे लाजतच म्हणाली.
11- तिचे म्हणणे मान्य करून रूपाली व सर्व विद्यार्थ्यांचा निरोप घेतला.
प्रियांजली शहा
विषय सहाय्यक, DIECPD
Thane.