Friday, 11 August 2017

शिक्षण परिषदेत चिखली,कोकणा सौंदड केंद्राचा त्रिवेणी संगमात संपन्न

👉👬 *शिक्षण परिषदेत चिखली,कोकणा सौंदड केंद्राचा  त्रिवेणी संगम*- 👬👈

➡  *आज दिनांक 11 ऑगस्ट 2017 ला पं समिती सडक अर्जुनीतील कोहमारा येथे  केंद्रप्रमुख  मान. लांडगे सर,बावनकुडे सर व पेंदाम सर  यांचा प्रशंसनीय पुढाकाराने  वेळ ,कष्ट  पैसा व श्रमाची बचत करणारी  सयुंक्त शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली*

➡ शाळांना   प्रगत करण्याकरीता ,शाळासिद्धीमध्ये शाळा  *अ* श्रेणीत कशी येणार याचे  केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन मिळण्याकरिता व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण प्रभावीपणे राबविण्याकरिता आजची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती .

➡  *या शिक्षण परिषदेला मार्गदर्शन करण्याकरता एक आठवड्यापूर्वीच चिखली ,कोकणा व सौंदड चे केंद्रप्रमुख यांनी DIECPD /DIET गोंदिया  येथे येऊन सध्याचे प्राचार्य मान.हिवारे सर यांना विनंती केली की आपण स्वतः यावे व सोबत शाळा शाळासिद्धीचे राज्यस्तरारील मार्गदर्शक यांना सोबत घेऊन यावे.

➡  *केंद्रातील  सर्व शाळा *अ* श्रेणीत आणण्याची सर्व केंद्रप्रमुखांची तळमळ बघून DIECPD गोंदिया  यांनी नियोजन करून सदर संयुक्तकेंद्र परिषदेत मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली .मान हिवारे सर पुणे येथे गेल्याने त्यांच्या ऐवजी *मान .रमतकर सर जेष्ठ अधिव्याख्याता गोंदिया ,कु.जाधव मॅडम अधिव्याख्याता , दिनेश उके IT विषय सहायक ,सुनील हरींणखेडे इंग्रजी ,विषय सहायक  व वशिष्ठ खोब्रागडे , विषय साधनव्यक्ती, शाळा सिद्धी राज्य राज्यस्तरावरील मार्गदर्शक यांनी उपस्थिती दर्शविली*.

➡ या शिक्षण परिषदेत मान. रमतकर सर जेष्ठ अधिव्याख्याता (वर्ग -1) यांनी  *ज्ञानरचनावाद हा प्रत्यक्ष अध्यापन करताना कृतीत आणायला हवा व सोबत  तंत्रज्ञानाची जोड हवी असे सांगितले* .
प्रभावी , रचनात्मक व  विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे वर्गातले वातारण कसे निर्माण करता येईल याचे डेमोलेसन घेऊन सर्व शिक्षकांमध्ये कार्य करण्याची प्रेरणा निर्माण केली.

कोणत्याही परिस्थितीत शिक्षक सक्षम , विध्यार्थी व शाळा   प्रगत झालीच पाहिजे हे आपले प्रथम कर्तव्यच आहे  याची जाणीव त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले.

*मान.वशिष्ठ खोब्रागडे   विषयतज्ञ /साधनव्यक्ती, पं स आमगाव व शाळासिद्धी मार्गदर्शक यांनी एकहाती संपूर्ण दिवसभर शाळासिद्धी उपक्रमाच्या माध्यमातून शाळा *अ* श्रेणीत आणण्याकरिता मोलाचे समुपदेशण केले व सलग 4 तासात
🌷NPSSE,
🌷SSEF,
🌷समृद्ध शाळा 7 क्षेत्र
🌷46 गाभा मानके
🌷गुणदान पद्धती
🌷प्रस्तावित कार्यवाही व नियोजन
🌷पुरावे निर्मिती व शोध
🌷जतन करण्याची पध्दती
🌷100℅ A ग्रेड शाळा करण्याची योजना।।
    या विविधध विषयावर विस्तृत माहिती देऊन शिक्षक बंधूंचे सर्व शंकांचे निरशन करण्यात आले

➡ *शिक्षण परिषदेला यशस्वी करण्याकरता मान .लांडगे सर ,पेंदाम सर केंद्रप्रमुख यांनी मोलाची भूमिका पार पाडली* .त्याच बरोबर कृषी विद्या मंदिर येथील मान.Bisen सर मुख्याध्यापक व तेथील सर्व कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

तसेच तिन्ही केंद्रातील सर्व शिक्षक यांनी दिवसभर आपली उपस्थिती दर्शवून या शिक्षण परिषदेचा आपल्या विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी  व शाळेच्या प्रगती साठी उपयोग करण्याचे आश्वासन देऊन विचारांना कृतीची जोड देण्याचे ठरविले .

*शब्दांकन* :: 🖌दिनेश उके ,IT 🖥 विषय सहायक ,DIECPD ,गोंदिया
संपर्क :8275297653/8208349623

No comments:

Post a Comment