* *तज्ञ मार्गदर्शकांची विभागीय कार्यशाळा ,नागपूर विभाग ,नागपूर*
आज दि 20 ऑगस्ट रविवार रोजी हिस्लोप महाविद्यालय ,सिविल लाइन ,नागपूर येथे तज्ञ मार्गदर्शकांची विभागीय कार्यशाळा सम्पन्न झाली.या कार्यशाळेला शिक्षण विभागाचे अक्षय प्रेरणास्रोत *आदरणीय नंद कुमार सरांचे समुपदेशन लाभले*
👉 कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी मंचकावर आदरणीय नंद कुमार सर ,श्री अनिल पारधी सर शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग ,श्री.श्याम मक्रमपुरे सर ,श्री देशपांडे सर संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण व माधुरी सावरकर मॅडम उपस्थित होते
👉 या कार्यशाळेला नागपूर विभागातील सहाही जिल्हयातील diecpd प्राचार्य ,ज्येष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता ,सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व विभिन्न विषयाचे सुलभक उपस्थित होते
👉 आदरणीय नंद कुमार सरांनी आपल्या समुपदेशनात :-
🌹मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे
🌹सगळी माणसाचीच मुले आहेत.
🌹 विषमतेची बीजे पेरू नका
🌹माणसांना जातीत विभागू नका 🌹वैज्ञानिक दॄष्टीकोणातून *जातीची परिभाषा करता येत नाही* हे सोदाहरण पटवून दिले.
🌹 *विचारांची प्रगल्भता* असल्याशिवाय परिणाम मिळवू शकत नाही.
🌹 मेंदूशास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे.ई.मुद्दे चर्चात्मक समुपदेशन केले.
👉शाळासिद्धी,इंग्रजी ,गणित ,तंत्रस्नेही ,mot ई.विषयावर सुलभकांनी जिल्हानिहाय एका विषयावर सादरीकरण केले
👉 श्री.श्याम सरांनी या प्रत्येक सादरीकरणानंतर समुपदेशन व आवश्यक त्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला
भंडारा जिल्ह्याचे वतीने नरेश नवखरे विषय साधन व्यक्ति तथा राज्यस्तरीय शालासिद्धि सुलभक यांनी शालासिद्धि विषयक सादरिकरन केले
शब्दाकन नरेश नवखरे विषय साधन व्यक्ति brc लाखनी जि भंडारा
Diecpd भंडारा
Sunday, 20 August 2017
मा. नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यशाळा संपन्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment